आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:जिल्हयातील 340 रुग्णांसाठीचे ऑक्सीजन गुरुवारी दुपारपर्यंत संपणार, ऑक्सीजन सिलेंडरवर बॅकअप घेण्याचे काम सुरु

हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

हिंगोली जिल्हयात असलेल्या ३४० रुग्णांसाठीचे ऑक्सीजन गुरुवारी ता. २२ दुपारपर्यंत संपणार असून आता साध्या ऑक्सीजन सिलेंडरवर रुग्णांचे ऑक्सीजन बॅकअप घेण्याची धावपळ सुरु झाली आहे. तर बाहेर राज्यातून ऑक्सीजन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

हिंगोली जिल्हयात आजच्या स्थितीत ३४० रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. यामध्ये काही रुग्ण हिंगोली शासकिय रुग्णालय, हिंगोलीतील डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, वसमत उपजिल्हा रुग्णालय व कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आहेत. या रुग्णांना ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोलीत दोन तर वसमत व कळमनुरी येथेही ऑक्सीजन टँक उभारण्यात आले आहे. हिंगोलीत सर्वात जास्त ३ केएल ऑक्सीजन दररोज लागले तर या ठिकाणी असलेल्या टँकची क्षमता १३ केएलची आहे.

दरम्यान, जालना येथून तसेच अहमदनगर येथून ऑक्सीजन मागविला जात आहे. मात्र मागील तीन दिवसांपुर्वी आलेले ऑक्सीजन आता सकाळपर्यंतच पुरणार आहे. तर कळमनुरी व हिंगोलीतील औंढा रोड भागातील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सीजन साठा आहे. तर वसमत येथील ऑक्सीजन टँक रिकामा झाल्यामुळे त्या ठिकाणी ४ ड्यूरा सिलेंडरमधून रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे. मात्र या ठिकाणीही ऑक्सीजन टँकसाठी ऑक्सीजनची गरज भसणार आहे.

दरम्यान, हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात सायंकाळपासूनच वैद्यकिय अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. या ठिकाणी चार ड्यूरा सिलेंडर असून ऑक्सीजन टँक मधील ऑक्सीजन गुरुवारी सकाळी संपल्यानंतर ड्यूरा सिलेंडरमधून बॅकअप घेतले जाणार आहे. एका सिलेंडरचे बॅकअप सात ते आठ तास चालणार आहे. या शिवाय इतर ऑक्सीजन सिलेंडर देखील उफलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असून आॅक्सीजन काँन्स्ट्रेटर देखील उपलब्ध आहेत. आता गुरुवारी ता. २२ रात्री पर्यंत ऑक्सीजन आणण्यासाठी धावपळ सुरु झाली असून त्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच शासकिय रुग्णालयाची यंत्रणाच कामाला लागली आहे.

चौकटीचा मजकूर

रुग्ण व नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये ः रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोलीत ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत असला तरी रुग्णांना पुरेल एवढा साठा ड्यूरा सिलेंडरमध्ये आहे. तर गुरुवारी दुपारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सीजन येणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. एकाही रुग्णाला ऑक्सीजन कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...