आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगणीतील घटना:साेसायटीच्या निवडणुकीवरून‎ मारहाण; तरुणाची आत्महत्या‎; 5 जणांवर पाचोड पाेलिसांत गुन्हा दाखल‎

विहामांडवा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणी (ता. पैठण) येथील २५ वर्षीय‎ विवाहित तरुणास मारहाण करत अपमानित‎ ‎ करून आत्महत्येस प्रवृत्त‎ ‎ केल्याप्रकरणी पाच‎ ‎ जणांविरुद्ध पाचोड पोलिस‎ ‎ ठाण्यात गुन्हा दाखल‎ ‎ केला. दादासाहेब ताराचंद‎ ‎ खराद असे आत्महत्या‎ ‎ केलेल्या विवाहित तरुणाचे‎ ‎ नाव आहे.‎

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार दादासाहेब‎ खराद हे ३० एप्रिल २०२३ पासून बेपत्ता होते.‎ दरम्यान, बुधवारी (३ एप्रिल) हिंगणी‎ शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाला‎ गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून‎ आला. मृताची पत्नी सुरेखा खराद (२२) हिने‎ आरोपी अनिल विनायक खराद, किरण रमेश‎ खराद, जना विठ्ठल खराद, दशरथ लक्ष्मण‎ पावसे व अशोक रंगनाथ सुडके (सर्व रा.‎ हिंगणी, ता. पैठण) यांनी सोसायटी‎ निवडणुकीत दादासाहेबने विरोधात काम केले‎ म्हणून त्यास दारू पाजून चापटबुक्क्यांनी‎ मारहाण केली.

त्यामुळे पती दादासाहेब खराद‎ यांना अपमान सहन न झाल्याने त्यांनी‎ लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या‎ केल्याचे फिर्यादीत नमूद केले अाहे. यावरून‎ पाच जणांविरुद्ध पाचाेड ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला अाहे.‎ तपास सपोनि. संतोष मानेंच्या मार्गदर्शनात‎ विहामांडवा पोलिस चौकीचे सपोउपनि.‎ सुशांत सुतळे, सुधाकर मोहिते, पो. काॅ.‎ ताराचंद घडे हे करत आहेत.‎