आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक पॅकेज:औरंगाबादच्या लघुउद्योजकांना एक-दोन दिवसांत पॅकेज शक्य, शहरात लवकरच कोरोना स्पेशल हॉस्पिटल : सुभाष देसाई

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 4761 उद्योगांना परवानगी

काेराेनाचे रुग्ण वाढत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याकडे राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी या जिल्ह्याला ८१ कोटींचा निधी दिला आहे. लवकरच या शहरात स्वतंत्र काेरोना हॉस्पिटल सुरू केले जाईल, असा विश्वास पालकमंत्री तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच राज्यातील लघुउद्योगांसाठी केंद्र शासन एक-दोन दिवसांत आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे, असेही देसाई यांनी सांगितले. केंद्राप्रमाणे राज्य शासनदेखील लघुउद्योगांना प्रोत्साहन, मदत करण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या उद्याेजक सदस्यांशी देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऋषी बागला, मानसिंग पवार, राम भोगले, जगन्नाथ काळे, उल्हास गवळी, कमलेश धूत आदी उद्योजक या संवादात सहभागी झाले होते. प्रारंभी देसाई यांनी करमाडजवळ झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. स्थलांतरित मजुरांसाठी राज्य शासनाने रेल्वेसेवा सुरू केली असून कामगारांनी धोका पत्करून प्रवास करू नये, असे आवाहन केले.

देसाई म्हणाले की, राज्यातील उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यात ४७६१ उद्योगांना परवानगी दिली आहे. ३ हजार उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. १६ हजार कामगार कामावर हजर झाले आहेत. लॉकडाऊनमुळे लघु-मध्यम उद्योगांवर मोठा बोजा आला आहे. याविषयी मी केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा केली आहे. त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत केंद्र शासन लघुउद्योगांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करेल.

बातम्या आणखी आहेत...