आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्यानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने वंदे मातरम सभागृहात १५ ते १९ डिसेंबरदरम्यान ‘पद्म महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ११ विजेते सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात १ पद्मविभूषण, २ पद्मभूषण आणि ८ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे आयोजन केले आहे.
वंदे मातरम सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता हाेणार आहे. मिसाइल सायंटिस्ट डॉ. प्रल्हाद रामाराव यांचे व्याख्यान दुपारी २ वाजता होणार आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेची विजेती साक्षी मलिकचे व्याख्यान १६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता होईल. याशिवाय अहमदनगरच्या बीजमाता राहीबाई पोपेरे, बीडचे गोसेवक सय्यद शब्बीर, लातूरचे डॉ. अशोक कुकडे, रायगडचे डॉ. हिंमतराव बावस्कर, आयसीएमआरचे माजी संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांचाही सहभाग आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. वाइल्डलाइफ छायाचित्रांचे आणि रांगोळीचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. १८ डिसेंबरला श्री श्री रविशंकर अमेरिकेतून ऑनलाइन मार्गदर्शन करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.