आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पद्मश्री डॉ. फातिमा झकेरियांचे कोरोनामुळे निधन, मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री डॉ.फातिमा रफिक झकेरिया (८५) यांचे कोरोना संसर्गामुळे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर बजाज रुग्णालयात २९ मार्चपासून उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी ९ वाजता संस्थेच्या कॅम्पसमध्ये डॉ. रफिक झकेरिया यांच्या समाधीशेजारी त्यांचा दफनविधी झाला.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉ. फातिमांना बजाजमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पत्रकारिता, समाजकार्य आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक योगदान दिले. मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट व मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीच्या त्या अध्यक्ष होत्या. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००६ दरम्यान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय १९८३ दरम्यान पत्रकारितेसाठी सरोजिनी नायडू इंटिग्रेटेड पुरस्काराने सन्मानित केले होते. टाइम्स ऑफ इंडियात वरिष्ठ सहायक संपादक आणि निवासी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात अर्शद आणि फरीद झकेरिया असे दोन पुत्र आहेत. दोघेही अमेरिकेत असून नावाजलेले पत्रकार आहेत. त्यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण कोरोनामुळे दोघेही अंत्यविधीसाठी हजर राहू शकणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...