आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारिया शोरूम:पगारिया शोरूम लुटणाऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत कोठडी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना राेडवरील पगारिया ऑटो शोरूम फाेडून १५ लाख ४३ हजार २४७ रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून बेड्या ठोकल्या. त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. क्षीरसागर यांनी दिले.

शिवा नागुलाल मोहिते (३२), सोनू नागुलाल मोहिते (२५, दोघे रा. विचवा, ता. बोदवड, जि. जळगाव) आणि अजय सीताराम चव्‍हाण (३२, रा. धानोरी, ता. बोदवड, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ४ लाख २८ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. आराेपींनी ३ ऑगस्ट राेजी चाेरी केली हाेती. याप्रकरणी अभिषेक अमिताभ रॉय यांनी फिर्याद दिली हाेती.

बातम्या आणखी आहेत...