आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरवादी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे मागणी:भडकल गेट, शहरातील स्मारकाची रंगरंगोटी करा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशासनाकडून भडकल गेट व शहरातील स्मारकाची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्याची मागणी आंबेडकरवादी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आली आहे.महानगरपालिका प्रशासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे व मुख्य चौकाचे सुशोभीकरणाचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानुसार भडकल गेट येथे महामानवाचे शासकीय स्मारक आहे. या ठिकाणी महापालिकेकडून १ एप्रिलपासून विद्युत रोषणाई, रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात येत असते.

शहर परिसरात अनेक महामानवाचे स्मारक, पुतळे व बौद्ध विहार आहेत. दरवर्षी या सर्व ठिकाणी मनपाकडून रंगरंगोटी व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येतात, परंतु अद्यापपर्यंत ही कामे सुरू झाली नाही. याबद्दल नाराजी व्यक्त करीत तत्काळ काम सुरू करावे, अन्यथा समितीच्या स्वखर्चाने ही कामे करणार, असा इशाराही दिला आहे. या वेळी आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे, किशोर खिल्लारे, राजू होशिळ, प्रांतोश वाघमारे आदी उपस्थित होते.