आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पैठणच्या भूमी अभिलेख सर्व्हेअरला कंत्राटदार भावासह 90 हजार रुपयांची लाच घेताना अटक

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषक जमीन अकृषकमध्ये (एनए) रूपांतरित करण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती त्यापैकी ९० हजार रुपये घेताना पैठणच्या भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर अनिल विष्णू सावंत (३७) व त्याचा सख्खा ठेकेदार भाऊ सचिन विष्णू सावंत (२४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री पैठण येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

स्थापत्य अभियांत्रिकीचे सल्लागार असलेल्या व्यक्तीने याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार केली हाेती. त्यांच्या पक्षकाराला कृषी जमीनचे अकृषकमध्ये रूपांतर करायचे हाेते. या जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही, हे पाहण्याचे व रेखांकन नकाशासह सीमारेषाही आखून देण्याचे काम पैठणच्या भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर अनिल सावंत यांच्याकडे होते. या कामापोटी पक्षकाराकडून सावंत यांनी यापूर्वीच ४५ हजार रुपये घेतले होते. मात्र तरीही काम केले नाही. उलट आणखी एक लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. या प्रकारामुळे त्रस्त झाल्यामुळे त्यासंदर्भातील तक्रार औरंगाबादच्या एसीबी दिली होती. तक्रारीची शहानिशा करून सोमवारी पोलिस निरीक्षक गणेश धोकरट यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...