आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:तोंडोळीतील शेतवस्तीत 2 महिलांवर दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार, बिडकीनजवळ घटना; पुरुषांना दोरीने बांधून 15 हजारांची लूट

बिडकीन (ता.पैठण)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीनजवळ तोंडाेळी (ता. पैठण) येथील शेतवस्तीत राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री ११ च्या सुमारास दराेडेखाेरांनी हल्ला चढवला. घरातील पुरुषांना दाेरीने बांधून १५ हजारांची लूट केली. इतकेच नव्हे तर घरातील दाेन महिलांवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कारही केला. या महिलांना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक पीडिता पाच महिन्यांच्या बाळाची आई आहे.

तोंडाेळीलगत अभय मगर यांच्या शेतात परप्रांतातील काही मजूर राहतात. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास सात ते आठ दराेडेखाेरांनी हल्ला चढवला. घरात घुसून पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवला व दाेरीने बांधून ठेवले. १५ हजार रुपये राेख व काही नकली दागिने घरातून घेतले. याच घरातील २३ व ३० वर्षीय दाेन महिलांवर सामूहिक अत्याचार केला.

पुरुषांना दांड्याने मारहाण करून घराबाहेर काढले
दरोडेखोरांनी आधी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. दराेडेखाेरांनी मजुरांचा एक माेबाइलही चाेरून नेला.

दाेन महिलांना बांधून ठेवले, दाेघींवर अत्याचार
दराेडेखाेरांनी तोंडाेळी वस्तीजवळ शेतात दारू प्यायली. नंतर दरोडा टाकला. या घरात एकूण ४ महिला होत्या. त्यातील २ महिलांना डांबून ठेवण्यात आले व दाेघींवर अत्याचार झाल्याचे पाेलिस चाैकशीत समाेर आले. ताेंडाेळीत अत्याचार केल्यानंतर दराेडेखाेर लोहगाव परिसरात शेतवस्तीवरही गेले. तिथे काही ग्रामस्थांना मारहाण करून लूटमार केली. पाेलिसांनी सुमारे पाच किमीचा परिसर पिंजून काढला. शेकटा रोडवरील शेतकरी तांबे यांच्या शेतातील पाण्याच्या हौदाजवळ मोबाइल, कुऱ्हाड, बनावट दागिने व दरोडेखोरांचे बदललेले कपडे पोलिसांनी हस्तगत केले.

बातम्या आणखी आहेत...