आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ प्रकाशन:पंडागळेंनी गाजवली पँथर, नामांतर चळवळ : हंडाेरे

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचा महापौर होता आले, पण स्थायी समिती सभापती नाही होऊ शकलो. रतनकुमार पंडागळे तीन वेळा सभापती झाले. पंडागळे यांनी त्या काळात पँथर तसेच नामांतराची चळवळ गाजवली, असे मत भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतनकुमार पंडागळे यांच्या “भीम ऊर्जेतून पेटलेला निखारा’ या गौरव ग्रंथाचे बुधवारी हंडोरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी होते. विद्यापीठ नामांतर ठराव दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात हा सोहळा पार पडला. प्रारंभी मुंबई येथील सीमा पाटील, संगीतकार जॉली मोरे यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा झाला.

झीवरील सारेगमप चॅम्प सक्षम सोनवणे यानेही दोन भीमगीते सादर केली. मंचावर प्र. ज. निकम, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, दौलत खरात, मिलिंद शेळके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, मोहन माने उपस्थित होते. रतनकुमार पंडागळे यांच्या एकूणच आंबेडकरी चळवळीतील कार्याचा लेखाजोखा या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केला. रतनकुमार साळवे यांनी सूत्रसंचालन केले. विलास पांडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...