आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:पंढरपूर ग्रा.पं. सदस्य, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

वाळूज10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर ग्रामपंचायतच्या चौघा विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला. त्यात पंढरपूरचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खोतकर, सारिका खोतकर, विठ्ठल सोनवणे, गंगाधर खोतकर यांच्यासह समर्थकांचा समावेश आहे.

या वेळी खासदार राजन विचारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना वरिष्ठ नेते विनोद घोसाळकर, जिल्हा उपप्रमुख बाप्पा दळवी आणि तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना शिंदे गटातील तसेच इतर पक्ष, संघटनेचे अनेक जण आपल्या संपर्कात असून त्यांचा लवकरच प्रवेश सोहळा घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...