आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सह. साखर कारखान्याचे बँक खाते जप्त

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकबाकी वसूल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. पर‌ळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत.

कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती.

औरंगाबादच्या ईपीएफओ कार्यालयाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाखांची वसुली केली. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशान्वये प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केली. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने कळवले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...