आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार आरोप प्रकरण:'हा विषय आता मागे पडलाय मात्र प्रकरण अत्यंत संवेदनशील', धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंनी सोडले मौन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेने यू-टर्न घेत धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप मागे घेतले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. दरम्यान आता महिलेने सर्व आरोप मागे घेतले आहे. यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. आता अखेर या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्या बहिण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे जवळपास आठ दिवस राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. मात्र या काळात धनंजय मुडेंच्या बहिण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलणे टाळले होते. मात्र आज त्यांनी याविषयावर मौन सोडले आहे. आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पंकजा यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'हा विषय आता मागे पडलाय. मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. ते प्रकरण तेवढ्याच सैद्धांतिकदृष्या आणि संवेदनशीलता दाखवून हाताळणे गरजेचे आहे, ज्या काही गोष्टी आहे, त्याचा भविष्यात निकाल लागेल. तसेच राजकारणात एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला तर त्यामध्ये त्याच्या कुटुंबातील मुलांना त्रास होत असतो. मी बाल कल्याण मंत्रीही राहिलेली आहे. त्यामुळे या विषयाकडे मी संवेदनशीलतेने बघते. हा विषय कुणाच जरी असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसते आणि आताही करणार नाही' असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू अशोक शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी दावा केला होता की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. दरम्यान यावर प्रचंड चर्चा झाली. यानंतर रेणू शर्मा या महिलेवर इतर काही नेत्यांनीही हनी ट्रॅपद्वारे फसवण्याचे आरोप केले. यानंतर महिलेने यू-टर्न घेत धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप मागे घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...