आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सल्ला:स्वतंत्र पक्ष काढावा, एमआयएम मदत करेल; पंकजांना ओबीसींचा मोठा जनाधार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत डावलल्याचा आराेप हाेत असलेल्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना खासदार इम्तियाज जलील यांना एक सल्ला दिला आहे. पंकजांचे नेतृत्व प्रभावी असून त्यांच्यामागे ओबीसींचा मोठा जनाधारही अाहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप हाेईल, असा सल्ला खासदार इम्तियाज जलील यांनी यांनी दिला आहे.

भाजपकडून पंकजा यांची वारंवार हेटाळणी हाेत आहे. अशा काळात पक्षात राहण्यापेक्षा त्यांनी बाहेर पडून स्वतंत्र पक्ष काढावा असा सल्ला मी त्यांनी यापूर्वी दाेनदा दिलेला आहे. गरज पडल्यास एमआयएम त्यांना मदत करेल. पंकजांच्या बहिण प्रीतम खासदार आहेत. त्यांच्याकडेही मी हे म्हणणे मांडले आहे, असेही इम्तियाज यांनी सांगितले.

एमआयएम सेनेची बी टीम : देवेंद्र

मुंबईत पत्रकारांनी विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इम्तियाज यांच्या सल्ल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून अधिक बाेलणे टाळले. पण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मत देऊन ‘एमआयएम’ उघडी पडली आहे. ती शिवसेनेची बी टीम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिसाद देणार नाहीत : दानवे

भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, ‘राजकारणात दुसऱ्यात खोडा घालण्याचा प्रयत्न प्रत्येकजणच करत करताे. मात्र पंकजाताई काही इम्तियाज यांच्या सूचनेला प्रतिसाद देणार नाहीत. त्या पक्षातील ज्येष्ठ आणि सूज्ञ नेत्या आहेत.’

बातम्या आणखी आहेत...