आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर निशाणा:'ज्यांच्याकडे बीड जिल्ह्याची जबाबदारी दिली, ते योग्यप्रकारे कर्तव्य बजावत नाहीत'

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाच रुग्णवाहिकेतून 22 मृतदेह कोंबून नेल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईतून समोर आली

बीड

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. कारण, त्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिलीय ते त्यांचे योग्य कर्तव्य बजावत नाहीयत', अशा शब्दात पंकजा यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'एखाद्या सामानासारखे 22 लोकांचे मृतदेह कोंबून अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. ही एक भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्याची आहे. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करावं की संताप व्यक्त करावं हे मला कळत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सरकारने अत्याचार करायचेच ठरवले आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आताच्या वर्तमान कोरोना परिस्थितीसाठी अतिशय भयानक आहे. राजकारण करण्याची माझी भूमिका कधीच नव्हती. कधीही मी भूमिका घेत असताना बोल्ड भूमिका घेतली आहे. कारण ती जनतेच्या हिताची आहे. कदाचित स्वतःचं नुकसान केलं असेल, पण मी माझी भूमिका प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडल्या आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय ते पाहून माझी हात जोडून विनंती आहे. मुख्यमंत्री महोदयांना आदरणीय शरद पवार साहेबांना, अजित पवारांना मी विनंती करते, आपण बीड जिल्ह्याकडे कृपया जातीने लक्ष द्यावे. आपण शासनाची जबाबदारी ज्यांच्यावर दिली ते स्वतःचे कर्तव्य बजावत नाहीत हे दर वेळेस स्पष्ट झाले आहे', अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...