आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपात झालेल्या बंडखोरीवर पंकजा मुंडेची प्रतिक्रिया

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वीच औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपात बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पण, अजून एका इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यावर आता भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भाष्य केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'शिरीष बोराळकर यांचे नाव मी दिले नाही. पक्षाने जो निर्णय घेतला त्यासोबत मी आहे. भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. याचा मला अहकांर नाही, तर प्रेम आहे. सर्वच जवळचे कार्यकर्ते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा आहे, तो पुन्हा खेचून आणू', असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात. उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. त्यामुळे भाजपने अधिकृत उमेदवार दिला असताना भाजपमधून आणखी दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला.