आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न:पंकजांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने संतप्त, पाथर्डीत घेतले विष

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेले भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गर्जे यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची याच विषयावर बैठक चालू होती. तहसील कचेरीतून एका आंदोलनाला भेट देऊन गर्जे यांच्यासह काही मुंडे समर्थक संपर्क कार्यालयात बसले होते. या वेळी चर्चा सुरू असतानाच गर्जे भावनिक झाले व त्यांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांसमोरच विष प्राशन केले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी गर्जे यांना वेळीच उपजिल्हा रुग्णालयात नेले. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नगर येथे हलवण्यात आले. दरम्यान, गर्जे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सायंकाळी सांगण्यात आले.

‘आपण जीव द्यायला तयार’
पंकजा मुंडेंसाठी आपण जीव द्यायला तयार आहोत, अशी पोस्ट मुकुंद गर्जे यांनी सोशल मीडियावर केली होती. याबाबत पत्रकारांनी भेट घेतली. त्या वेळी प्रतिक्रिया देत असतानाच त्यांनी जवळची बाटली काढून विष प्राशन केले

बातम्या आणखी आहेत...