आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारपूस:विष घेणाऱ्या गर्जेंची पंकजांकडून ‘पीए’मार्फत विचारपूस, ‘भूमिका जाहीर केल्यावर भेटू’चा दिला निराेप

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आराेप करत त्यांचे पाथर्डी येथील समर्थक मुकुंद गर्जे यांनी चार दिवसांपूवी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. आता गर्जे यांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकांनी गर्जेंच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच “लवकरच आपण आपली भूमिका जाहीर करू. त्यानंतरच भेटू,’ असा पंकजांचा निराेपही त्यांनी गर्जेंना दिला. त्यामुळे पंकजा आता काय भूमिका जाहीर करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ‘संतापाचा अतिरेक झाल्याने आपण विष घेतले. भाजपच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वाला मी विनंती करतो की, महाराष्ट्रातही पंकजा मुंडेंच्या रुपाने ‘वायएसआर पॅटर्न’ उदयास येऊ शकतो,’ असे गर्जे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले.

भाजप नेत्यांना तालुक्यात फिरू देणार नाही : उपाध्यक्ष
पंकजा मुंडेंवर भाजपकडून वारंंवार अन्याय होत आहे. यापूर्वीही त्यांना डावलण्यात आले हाेते तेव्हा पंचायत समिती सभापतिपदाचा मी राज्यात सर्वप्रथम राजीनामा दिला होता. पंकजाताई जाे निर्णय घेतील त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत. त्यांना अपमानित केले तर वरिष्ठ नेत्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...