आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपातील सर्वाधिक चर्चेतील अधिकारी सखाराम पानझडे हे अखेर २६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. विधानसभेत त्यांच्या पदाेन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. निवृत्त झाल्यानंतर त्यांना तीनदा मुदतवाढ मिळाली हाेती. त्यांनी दीड वर्ष शहर अभियंता पदावर काम केले. ३१ डिसेंबरची मुदत संपल्यानंतर त्यांचा पदभार नगररचना उपसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडे साेपवण्यात आला. त्यांच्याकडील विद्युत विभागाचा पदभार कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांच्याकडे देण्यात आला आहे. पानझडे कनिष्ठ अभियंता म्हणून मनपात रुजू झाले हाेते. २०१२ पासून त्यांच्याकडे शहर अभियंता पदाचा कार्यभार होता.
मनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींशी त्यांचे चांगले सबंध होते. शेवटच्या टप्प्यात २४ कोटींचे रस्ते आणि हर्सूल तलावातील गाळ प्रकरणात त्यांची चौकशी लागली होती. जून २०२१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. मात्र, दुसरे अधिकारी नसल्याने तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यांना सुरुवातीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा दोनदा सहा-सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आमदार प्रशांत बंब यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कारभार आणि पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. त्यावर शासनाने त्यांची चौकशी करण्याची घोषणा केली. शेवटच्या टप्प्यातही पानझडे यांच्या मुदतवाढीची चर्चा होती.
मात्र चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारल्याची चर्चा आहे. मागच्या २० वर्षांत मनपाच्या अनेक मोठ्या प्रकल्पांत पानझडे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यात प्रामुख्याने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, १५२ कोटींचे रस्ते, संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण, बाळासाहेब ठाकरे उद्यानाची निर्मिती, स्मार्ट सिटीतून होणाऱ्या ३१७ कोटींच्या रस्त्यांना तांत्रिक मान्यता आदी कामांचा समावेश हाेता. याशिवाय स्मार्ट सिटीचे नोडल ऑफिसर म्हणूनही त्यांच्याकडे पदभार होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.