आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानावर आधारित प्रश्न:एमपीएससीचा 40 टक्के उमेदवारांना पेपर अवघड, 2285 जणांची दांडी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा पूर्वपरीक्षा शनिवारी घेण्यात आली. यात उमेदवारांना १०० प्रश्नांचा पेपर ६० मिनिटांत सोडवावा लागला. या परीक्षेत विज्ञानावर आधारित प्रश्न विचारल्याने ४० उमेदवारांनी पेपर अवघड गेल्याचे केंद्राबाहेर आल्यानंतर सांगितले. त्यामुळे वेळेच्या आत ६० टक्केच उमेदवारांना पेपर सोडवता आला.

या परीक्षेसाठी औरंगाबादेतून १२,६५९ उमेदवारांनी नोंदणी केली हाेती. ही परीक्षा शहरातील ३९ उपकेंद्रांवर घेण्यात आली. प्रत्यक्षात १०,३७४ उमेदवारांनी परीक्षा दिली असून २,२८५ जणांनी दांडी मारली. या उमेदवारांना ३० पानांची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. यात १०० गुणांसाठी १०० प्रश्न दिले हाेते. हे १०० प्रश्न ६० मिनिटांत सोडवावे लागले. यात विज्ञानव्यतिरिक्त गणित, इतिहासावर आधारित प्रश्न साेपे गेल्याचे उमेदवारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...