आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरंभ’ला 15 हजार रुपयांची मदत:दिव्यांगही मारू शकतात ऑलिम्पिकपर्यंत मजल : भारसाखळे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आरंभ संस्थेमध्ये स्पोर्ट््स डे साजरा झाला. या वेळी क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी क्रीडा साहित्यासाठी संस्थेला १५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला. संस्थेच्या संचालिका अंबिका टाकळकर उपस्थित होत्या. या वेळी भारसाखळे म्हणाले, विशेष मुलांमध्येही क्रीडागुण असतात. ही मुले कोणता खेळ खेळू शकतात हे निश्चित केल्यावर त्यांना प्रशिक्षण देता येते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांग मुलेही विविध पॅरा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ऑलिम्पिकपर्यंत मजल गाठू शकतात. विविध स्पर्धांतील विजेत्यांना भारसाखळे यांच्या हस्ते पदकांचे वितरण करण्यात आले. अंबिका टाकळकर यांनी भारसाखळे यांचे स्वागत केले. आरंभचे गोपाल देशमुख, अश्विनी वांढेकर, विजयश्री जाईबहार आदी उपस्थित होते. टाकळकर यांनी प्रास्ताविकात संस्थेतील मुलांची खेळातील बलस्थाने सांगितली.

बातम्या आणखी आहेत...