आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी समर्थ सेवा केंद्र:150 केंद्रांत 6,300 महिलांचे पारायण ; महाप्रसादाने उत्सवाचा शेवट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामधील १५० श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ६,३०० महिला गुरुचरित्र पारायणाला बसल्या आहेत. या केंद्रांत विविध याग केले जात आहेत. त्यासाठी महिलांनी घरून आणलेल्या समिधांचा वापर करण्यात आला, अशी माहिती शशी पाटील यांनी दिली. गणेश यागात मोदक लाह्या, रुईच्या समिधा हवनासाठी वापरण्यात आल्या. तांदूळ, गहू, साखर, शुद्ध तूप यापासून बनवलेले हविर्द्रव्य होम हवनासाठी वापरले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण उपक्रम राबवला जातो. विशेष म्हणजे यामध्ये महिला पुरोहित संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करतात. ७ डिसेंबर रोजी पारायणाची सांगता होईल. यानंतर महाप्रसादाने उत्सवाचा शेवट होईल.

बातम्या आणखी आहेत...