आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट:‘परदा’ लघुपटाचा देशभरातील अनेक चित्रपट महोत्सवात डंका, मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाच नामांकन प्राप्त

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील तरुणांनी एकत्र येऊन निर्मिती, दिग्दर्शन केलेल्या ‘परदा’ लघुपटाचा देशभरातील विविध चित्रपट महोत्सवात डंका वाजत आहे. नुकतेच मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाच नामांकन प्राप्त झाले. दिग्दर्शक के. रोहित रामास्वामी यांना तीन बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्मसह तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

लघुपटाचे चित्रीकरण शहरात झाले आहे. यात अविनाश सोनी व दीक्षा मान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. औरंगाबादचे छायाचित्रकार श्रीकृष्णा शिवदास यांनी संकलन केले आहे. तर सुमेध मराठे यांचे छायाचित्रण तर मनन मुंजाळ यांनी संगीत दिले आहे. या लघुपटाला मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाच नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार लघुपटाने पटकावला. पुणे लघुचित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट, वर्ल्ड इंडिपेंडंट सिनेमा अवॉर्ड, येलोस्टोन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, दिल्ली येथे या लघु चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. चेन्नई येथील समर फिल्म फेस्टिव्हल, नेक्स्टजेन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

बातम्या आणखी आहेत...