आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा विमानतळाचा समावेश उडान ३ मध्ये करावा, यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यास शिंदे सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. नवीन सात ठिकाणी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्यासाठी स्पाइसजेट विमान कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसाेबत बैठक झाली. चिकलठाणा विमानतळावर विमानांच्या पार्किंगसाठी स्पाइसजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अनुकूलता दर्शवल्याचे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.
चिकलठाणा विमानतळावरून जवळच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी औरंगाबादचा समावेश उडान ३ मध्ये करण्याच्या मागणीचे निवेदन मंत्री शिंदे यांना दिले. औरंगाबादहून अहमदाबाद, बंगळुरू, नागपूर, इंदूर, उदयपूर, पुणे, गोवा आदी ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला आहे. मुंबईला विमानांची मोठी वर्दळ असल्याने तेथे पार्किंग शक्य होत नाही. तेव्हा अशा विमानांचे पार्किंग चिकलठाणा विमानतळावर केल्यास मुंबईच्या तुलनेत केवळ ५० टक्के खर्च येईल. विमान पार्किंगला आले तर येताना व जाताना प्रवासी मिळतील. त्यामुळे पार्किंगचा खर्चही निघेल. स्पाइसजेट सेवा देण्यासाठी तयार झाल्याचा दावा कराड यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.