आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात अर्धवेळ नोकरीची संधी:प्रादेशिक वृत्त विभागात जागा, 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात मराठी, उर्दूसाठी हंगामी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार, मराठी भाषेसाठी हंगामी संपादक, वार्ताहर आदी पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वृत्तनिवेदक आणि भाषांतरकारसाठी कमाल पन्नास वयोमर्यादेपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतील. तर वार्ताहर पदासाठी 21 ते 50 अशी वयोमर्यादा आहे.

कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. उर्दू भाषेसाठी उमेदवारांचे उर्दु भाषेवर प्रभुत्व असणे अनिवार्य आहे. वार्ताहरपदासाठी वृत्तपत्राविद्या आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदव्युतर पदविका असावी. इंग्रजी भाषेत लिहिण्याचे कौशल्य आवश्यक आहे. वृत्तनिवेदक, भाषांतरकार पदासाठीही पदवी किंवा पदव्युत्तर पदविकेसह पत्रकरितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

354 रुपये शुल्क

आवाजाच्या क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व उमेदवारांना महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती असणे गरजेचे आहे. संगणक हाताळणीचे प्राथमिक ज्ञान अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, उमेदवार औरंगाबाद महानगरपालिका कार्यकक्षेत राहणारा असावा. शहराच्या बाहेरील उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातील या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 354 रुपये शुल्क आकारण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गीयांसाठी हे शुल्क 266 रुपये आहे.

या संकेतस्थळाला भेट द्या

राष्ट्रीयकृत बँकेत शुल्काचा भरणा करून डिमांड ड्राफ्ट काढावा. प्रसारभारती, आकाशवाणी औरंगाबाद यांच्या नावे हा डिमांड ड्राफ्ट असावा. त्यानंतर कार्यालय प्रमुख, आकाशवाणी, औरंगाबाद, 431005 या पत्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत डिमांड ड्राफ्ट असलेला अर्ज टपालाद्वारे अथवा थेट पोहोचता करता येईल. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/pbvacancies/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इच्छुकांनी अर्ज करावेत

शिवाय याच संकेतस्थळावरून अर्जाचा मसूदा डाऊनलोड करता येईल. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या airnews_arngbad या ट्विटर हँडल आणि AIRAURANGABAD या फेसबुक पेजवरही सदरील माहिती उपलब्ध आहे. जास्तीत जास्त इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन प्रसार भारती आणि आकाशवाणीतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...