आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दिन:प्रेरणा ट्रस्टच्या रांगोळी स्पर्धेत 10 दिव्यांगांचा सहभाग ; सुरेख रांगोळी आली रेखाटण्यात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग दिनानिमित्त प्रेरणा ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धा झाली. स्पर्धेत सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली. यामध्ये स्वाती पठाडेने प्रथम क्रमांक तर संगीत खुर्ची स्पर्धेत योगेश सनगटे, मुलींमधून उजमाबी यांनी बाजी मारली.ट्रस्टचे सचिव अब्दुल हुसेन, कार्यवाह पी.पी. पाटील, एन.पी. पाटील, एस.डी. शेजूळ, वैशाली बागूल, साहेबराव म्हस्के, गंगाधर नाईक यांची उपस्थिती होती. दहा दिव्यांग मुलींनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला. सुखी माझ्या आईवडिलांचा ठेवा असा संदेश त्यांनी दिला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती पठाडे, द्वितीय नागेश चिलकावार, तृतीय समंद मालनकर यांनी, तर संगीत खुर्चीमध्ये प्रथम - योगेश सनगटे, द्वितीय- सय्यद इस्माईल, तृतीय -सतीश औताडे, मुलींमध्ये- प्रथम- उजमाबी, द्वितीय - कल्पना जाधव, तृतीय -वैशाली भंडारी यांनी बाजी मारली.

प्रत्येक दिव्यांग स्वावलंबी होऊ शकेल
आम्हाला सहानुभूतीची गरज नाही. क्षमतेनुसार काम मिळाले तर तो स्वावलंबी होईल. दिव्यांग घरच्यांना ओझे वाटणार नाही. शासनाने नियमांची अंमलबजावणी करावी.
- भाग्यज्योती सराफ

बातम्या आणखी आहेत...