आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री लाभार्थींशी आज साधणार संवाद:प्रत्येक जिल्ह्यातील 50 लाभार्थींचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आनंदाचा शिधा आणि विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १३ एिप्रल रोजी सायंकाळी चार वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या शिधा व इतर वस्तूंचे वितरण पात्र लाभार्थींना योग्य प्रकारे होते किंवा कसे, याबाबत लाभार्थींच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमात जाणून घेण्यात येणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत योजनेचा लाभ घेताना लाभार्थींना अडचणी किंवा समस्या येत असल्यास त्या जाणून घेतल्या जाणार आहेत. याबरोबरच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि शिवभोजन थाळीचे वितरण कशाप्रकारे होते, याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहेत.

या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५० लाभार्थी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.