आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Independence Day | 75 Year Completed Independence India | Partition Also Fragmented The Film Industry, Though 182 Films Were Released In 15 Languages This Year

मी 1947चा हिंदुस्थान बोलतोय:फाळणीमुळे चित्रपट उद्योगाचेही तुकडे झाले, तरीही या वर्षी 15 भाषांत प्रदर्शित झाले 182 चित्रपट

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभाजनाचे पडसाद चित्रपटसृष्टीत स्पष्टपणे उमटू लागले होते. पंजाबचा एक भाग पाकिस्तानात जाणार आहे, हे कळताच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आपल्या मातीकडे परतण्याची भाषा करत पाकिस्तानच्या बाजूला झुकले. यामध्ये नूरजहाँ, साहिर लुधियानवी, बेगम पारा आणि बिब्बोसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. लता मंगेशकर यांचे गुरू अमानत अली खान भेंडीबाजारवाले हेही पाकिस्तानी झाले होते. उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी लाहोरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, यापैकी अनेक जण नंतर हिंदुस्थानात परतले. मात्र यादरम्यान हिंदुस्थानचे चित्रपट थांबले नव्हते. या वर्षीही १५ भाषांमध्ये २८० चित्रपट तयार झाले. इकडे विभाजनाचा प्रस्ताव तयार करणाऱ्या माउंटबॅटन यांनी २ जूनला लंडनहून परतताच सत्तेचे हस्तांतरण लवकरच होईल, अशी घोषणा केली. नेहरू, पटेल, कृपलानी, जिना, लियाकत अली, अब्दुल रब निस्तार आणि बलदेवसिंह यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. विभाजनाच्या योजनेला आपली सहमती आहे, अशी घोषणा ३ जून १९४७ रोजी सायंकाळी ७ वाजता चार प्रमुख नेत्यांनी (नेहरू, पटेल, बलदेवसिंह, जिना) रेडिओवरून केली.

हे एकताच माझ्या जनतेमध्ये हाहाकार उडाला. अनेक अपेक्षांनी आकार घेतला, तर काही अपेक्षांचा भंग झाला. गांधीजी हताश होते. गांधीजी काँग्रेसशी संबंध तोडून ४ जूनच्या प्रार्थना सभेत त्यांच्या योजनेचा निषेध करणार आहेत, हे माउंटबॅटन यांना कळताच त्यांनी गांधीजींना व्हाइसराॅय हाऊसमध्ये बोलावून घेतले. माउंटबॅटन यांना यश मिळाले. ४ जून १९४७ च्या सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्तेच्या हस्तांतरणाची तारीख जाहीर केली, ती होती १५ ऑगस्ट १९४७. संपूर्ण देशाला धक्का बसला. लंडनमध्ये भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर करण्याची प्रतीक्षा करत असलेले ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनाही धक्का बसला. विभाजनाच्या घोषणेमुळे काश्मीर संस्थानात गोंधळ माजला. पाकिस्तानात सामील होण्याचा दबाव राजा हरिसिंह यांच्यावर होता, मात्र काश्मीरमधील हिंदू, शीख आणि बौद्ध नागरिक हिंदुस्थानचाच भाग होऊन राहू इच्छित होते. - उद्या वाचा : विभाजनाचे काउंटडाऊन सुरू

बातम्या आणखी आहेत...