आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिंग:सिग्मा हॉस्पिटल केअर ग्रुपसोबत भागीदारी; 250 बेडचे नवीन हॉस्पिटलही उघडणार

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नावाजलेल्या सिग्मा हॉस्पिटलचे आता केअर ग्रुपसोबत जॉइंट व्हेंचर झाले आहे. त्यामुळे सिग्माचा विस्तार होेणार असून, २५० बेडचे हॉस्पिटल सुरू होणार आहे. यामध्ये पीडियाट्रिक्सच्या सुपरस्पेशालिटी, रेडिएशनचे अत्याधुनिक युनिट, आयसीयू सुविधा असेल. औरंगाबादच्या मेडिकल हबची ओळख आणखी मोठी होणार आहे. येत्या महिनाभरात नव्या हॉस्पिटलचे भूमिपूजन होईल, असे सिग्माचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी सांगितले.

सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे म्हणाले, गेल्या दशकभरापासून मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील साडेचार लाखांपेक्षा आधिक रुग्णांवर सिग्मामध्ये उपचार करण्यात आले. जालना रोडवर २००८ मध्ये ३५ बेडचे हॉस्पिटल होते. त्याचा विस्तार होत २०१३ मध्ये २१० बेडच्या सिग्माची सुरुवात झाली. २०१८ मध्ये आणखी ३५ बेडचे रुग्णालय उघडले.

सिग्माच्या माध्यमातून २८० बेडचे रुग्णालय चालवण्यात येत आहे. पहिले अवयव प्रत्याराेपणही सिग्मातच झाले होते. विस्तारासाठी केले जॉइंट व्हेंचर : डॉ. टाकळकर म्हणाले, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, युरॉलॉजी ऑर्थोपेडिक अॅडव्हान्स ट्रीटमेंटही सुरू करणार आहाेत.सर्व आराेग्य सुविधा एकाच छताखाली : रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली हव्या आहेत. प्रत्येक वेळी मुंबई, पुण्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे चांगल्या सुविधा येथे मिळतील.

व्यवस्थापन, डॉक्टर कायम
सिग्माची पार्टनरशिप झाली तरी डॉक्टर, कर्मचारी, सीएमडी म्हणून मी कायम राहणार असल्याचे डॉ. टाकळकर म्हणाले. केअरची देशभरात मोठी चेन आहे. ग्लोबल प्लॅटफाॅर्मवर औरंगाबादची वेगळी ओळख निर्माण हाेईल.

‘केअर’चे देशात हॉस्पिटल्स
डॉ. रोटे म्हणाले, केअर ग्रुपची पॅरँट कंपनी अमेरिकेची टीपीजी (टेक्सास पॅसिफिक ग्रुप) आहे. भारतात त्यांच्या केअर हॉस्पिटलच्या १८ शाखा आहेत. हॉस्पिटलचे सीईओ जसदीप सिंह यांच्या उपस्थितीत भागीदारी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...