आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घाटीत पास सिस्टिम;एकाच गेटने प्रवेश

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टरांच्या संपानंतर घाटीत गुरुवारपासून पास सिस्टिमला सुरुवात झाली. आता रुग्णाच्या दोन नातेवाइकांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी अपघात विभागाच्या नाेंदणी खिडकीजवळ पासची व्यवस्था करण्यात आली असून दोनपैकी एक गेट बंद करण्यात आल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास राठोड यांनी दिली.

डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर घाटी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोरील गेट बंद केले आहे. त्यामुळे आता अपघात विभागाच्या समोरील गेटनेच प्रवेश दिला जात आहे. पहिला दिवस असल्यामुळे काही प्रमाणात गर्दी झाली हाेती.

सुरक्षा रक्षक तैनात केले
वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोरील गेट बंद केल्याने अपघात विभागासमोर गर्दी वाढली आहे. घाटीत मराठवाड्यातून लोक येतात. त्यामुळे त्यांना याची माहिती नाही. मात्र, साधारण आठवड्याभरानंतर सर्व प्रक्रिया सुरळीत होईल, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अपघात विभागासमाेर मेस्को आणि मेडिसिन विभागासमोर एमएसएफचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

खिडकीतच मिळताहेत पास
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास राठोड म्हणाले, सुरुवातीला आरएमओ आणि अपघात विभागासमोरील खिडकीतून पास दिले जात होते. मात्र, आरएमओकडून पास देण्यात अडचणी येत हाेत्या. त्यामुळे जेथे नाेंदणी केली जाते तेथेच पास देण्यात येतील. पहिल्या दिवशी जे रुग्ण भरती आहेत त्यांची माहिती घेऊन नातेवाइकांना पास देण्यात आले. पहिल्या दिवशी साधारण सव्वाशे पास वाटप झाले. पास सिस्टिम लागू केल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना नव्हती. त्यामुळे अनेक जण सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत होते.

बातम्या आणखी आहेत...