आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पोलिसांच्या हाती कुऱ्हाड अन् विळे पाहून प्रवासी अचंबित, अर्धा किलोमीटर अंतरावरील झाडेझुडपे तोडल्याने वाहनचालकांची सोय

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औंढा नागनाथ येथे रस्त्यावरील वळणावर झाडेझुडपे वाढल्यामुळे समोरील वाहने दिसण्यास येत होता अडथळा

औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट ते नॅशनल ढाबा या मार्गावरील वळणावर झाडेझुडपे वाढल्याने वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसण्यास अडथळा होत असल्याने अपघाताची संख्या वाढली होती. त्यामुळे हट्टा पोलिसांनीच हातात कुऱ्हाडी व विळे घेऊन रस्त्यालगतचे झुडपे व झाडे तोडून रस्ता मोकळा केला. सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात ही मोहिम राबविण्यात आली. मात्र पोलिसांच्या हाती कुऱ्हाड अन् विळे पाहून प्रवासीही अचंबित झाले होते.

औंरंगाबादकडून नांदेडकडे तसेच आंध्र प्रदेशात जाणारी वाहने औंढा नागनाथ जिंतूर टी पॉइंटपासून पुढे वसमत मालेगाव मार्गे धावतात. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असले. या मुख्य रस्त्यालगत औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पाॅइंट ते नॅशनल ढाबा येथील वळणावर झाडेझुडपे वाढल्यामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांची माहितीच मिळत नसल्याने अपघाताची संख्या वाढली होती. या मार्गावर दररोजच किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होऊ लागले होते. अपघातानंतर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वाढले होते तर अनेक जण जायबंदी झाले होते.

दरम्यान, या ठिकाणाला पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये रस्त्यावर येणाऱ्या झाडे व झुडुपे अपघाताचे कारण होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कलासागर यांनी सदरील रस्त्यावरील झाडे झुडपे काढून रस्ता साफ करण्याच्या सूचना हट्टा पोलिसांना दिल्या. त्यावरून हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार ठाकूर, कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने शुक्रवार व शनिवारी ता. २१ दोन दिवस या ठिकाणी श्रमदान करून झुडपे तोडून टाकली. मोठ्या झाडांच्या फांद्या जेसीबीच्या मदतीने काढून टाकल्या. त्यामुळे वळण रस्त्यावर दूरवरून येणारी वाहने देखील स्पष्ट दिसू लागली आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser