आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांचे हाल:बससेवेचे वेळापत्रकच नसल्याने प्रवाशांची काेंडी, माेजक्याच बस साेडण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद बसस्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशांना अशी धावपळ करावी लागते. छाया : संतोष देशमुख

सुमारे पाच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली खरी; मात्र सुरुवातीचे दाेन दिवस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जे प्रवासी बाहेरगावी जाऊ इच्छितात त्यांना बससाठी तासन‌‌्तास ताटकळत बसस्थानकात बसावे लागते. कारण ठरावीक मार्गावर आसन क्षमतेच्या निम्मे (२१) प्रवासी आले तरच एक बस साेडण्यात येते. प्रत्येक मार्गावर तितके प्रवासी मिळण्यास बराच वेळ लागताे. काही गाड्यांमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळही करावी लागते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी गौरीचे आगमन होत आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार दररोज बस सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सिडकाेतून २७ बस साेडल्या

सिडको बसस्थानकातून सोमवारी जालना, नागपूर, यवतमाळ, लातूर, सोलापूरसाठी एकूण २७ बस साेडण्यात आल्या. यापैकी सर्वाधिक बस जालन्यासाठी गेल्या, अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल भुसारी यांनी दिली. प्रवासी संख्येनुसार बस सोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती बसस्थानकावरही माेजक्याच बस साेडण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.