आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरड कोसळले:कन्नड घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद; औरंगाबादला येणाऱ्यांनी जळगाव किंवा नांदगाव मार्गाने यावे, महामार्ग पोलिसांचे आवाहन

कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरडी कोसळल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून घाटात अनेक वाहने अडकली आहेत.

औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या संततधार पावसाने या दरडी कोसळल्या आहेत. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहतूक पोलिसांनी दरडी कोसळल्याने पर्यायी मार्ग सांगितले आहे.

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
कन्नड घाटात खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने नागरिकांनी कन्नड घाटाकडे येऊ नये. औरंगाबादला जायचे असल्यास नांदगाव मार्गाचा वापर करावा आणि औरंगाबादमधून बाहेर जायचे असल्यास जळगाव मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे. - पीएसआय भागवत पाटील, महामार्ग सुरक्षा पथक चाळीसगाव.

बातम्या आणखी आहेत...