आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अभिज्ञा सुर्वेंचा सल्ला:मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डोळ्याची काळजी घ्यावी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. अभिज्ञा सुर्वे यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, जीएलएसएके स्लम हेल्थ प्रोजेक्ट, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी स्नेहमिलन कार्यक्रम झाला त्या वेळी रुग्णांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी उद्योजक दीपक तोष्णीवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवाकर कुलकर्णी उपस्थित होते.

दीपक तोष्णीवाल म्हणाले की, डोळा हा मानवाचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. एक दिवस डोळे झाकून ठेवले तर डोळ्याचे महत्त्व लक्षात येईल. आरोग्य केंद्राच्या सीसीआयएल कम्युनिटी ऑफथॅल्मिक प्रकल्पांतर्गत तीन आरोग्य केंद्रात अत्यल्प शुल्कात डोळ्यांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात येते. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत ९७ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवले होते. त्यापैकी ५० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...