आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष पाटील म्‍हणाले:शिक्षकांवर टीकेचा बंबना अधिकारच नाही

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकासकामांवर मते मागण्यापेक्षा वेगवेगळी आयुधे वापरून निवडणुका जिंकणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांना शिक्षकांवर आरोप करण्याचा, शिक्षण क्षेत्राला बदनाम करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, बंब यांनी गेल्या १५ वर्षांत मतदारसंघात केलेली पाच भरीव कामे सांगावीत. ते म्हणतात की, शिक्षकांनी मुख्यालयी राहावे यासाठी मी नऊ वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, तर त्यांनी शासनासोबत काय पत्रव्यवहार केला याचे पुरावे द्यावेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहावे यासाठी त्यांच्या निवासस्थानांसाठी काय प्रयत्न केले, याची माहिती द्यावी, असे पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...