आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लाच घेताना वेतन अधीक्षकाला अटक

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारी वडील आणि कर्करोग झालेल्या पत्नीच्या उपचारासाठीच्या बिलांच्या मंजुरीसाठी शिक्षकाकडे प्रत्येक बिलामागे २० टक्के कमिशन मागणारा जिल्हा परिषदेच्या भविष्य निर्वाह निधी विभागाचा वेतन अधीक्षक दिलीप परशुराम जऊळकर (५०, एन-४) याला ५० हजार रुपये घेताना त्याच्या दालनात एसीबीने बुधवारी अटक केली. तक्रारदार शिक्षक जि. प. शाळेत कार्यरत असून त्यांची पत्नीही शिक्षिका आहे. त्यांच्या वडिलांच्या आणि पत्नीच्या उपचाराची ६ लाख ६३ हजारांची १४ बिले ट्रेझरीकडे पाठवण्यासाठी जऊळकरने लाच मागितली होती. त्यामुळे शिक्षकाने एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. निरीक्षक संदीप राजपूत यांनी सापळा रचला.

बातम्या आणखी आहेत...