आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:टप्प्याटप्प्याने फी भरू द्या; एमआयएम विद्यार्थी संघटनेची लिटल फ्लॉवरसमोर निदर्शने

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे कोणाचा रोजगार गेला, अनेकांचा व्यवसाय बुडाला याची माहिती असूनही लिटल फ्लॉवर शाळेचे व्यवस्थापन एकदाच फी भरण्याची सक्ती करत आहे, असा आरोप करत पालक, एमआयएम विद्यार्थी संघटनेने या शाळेसमोर गुरुवारी (१६ जून) निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने फी भरू द्या, अशा मागणीचे निवेदन त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाकाळातील आर्थिक अडचणींमुळे काही पालक फी भरू शकले नाहीत. आता ते टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्यास तयार आहेत. या मुलांना पुढील वर्गात पाठवावे. एकदा पाहिलीत प्रवेश घेतल्यावर दरवर्षी नव्याने प्रवेश घ्यावा लागतो. ही पद्धत बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता लिटल फ्लॉवर शाळा व्यवस्थापनाचे कोणीही उपलब्ध झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...