आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही जाणून घेणे गरजेचे:नाेकरी साेडण्यापूर्वी 60 महिन्यांच्या मूळ वेतनाने हाेणार पेन्शन गणना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन याेजनेत (ईपीएस) २०१४ मध्ये झालेली दुरुस्ती वैध ठरवली आहे. त्याअंतर्गत पेन्शनची गणना कर्मचाऱ्याच्या मासिक कमाल वेतन मर्यादा १५ हजार रुपयांनुसार केली जाणार आहे. या निर्णयाचा कर्मचारी व इतर घटकांवर हाेणारा परिणाम जाणून घेऊ..

{पेन्शनयाेग्य वेतन गणनेचा आधार काय आहे? २०१४ च्या दुरुस्तीनुसार याेग्य वेतनाची गणना कर्मचाऱ्याच्या नाेकरी साेडण्यापूर्वीच्या ६० महिन्यांच्या मूळ वेतनावर आधारित असेल. दुरुस्तीपूर्वी हा कालावधी केवळ १२ महिन्यांचा हाेता. निवृत्तिवेतन निश्चित करताना गेल्या १२ महिन्यांतील उतार-चढावाची शक्यता संपुष्टात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे ईपीएफआेचे म्हणणे आहे. {सवलत असलेल्या प्रतिष्ठानांना हे लागू असेल? हाेय. २०१४ ची दुरुस्ती सामान्य प्रतिष्ठानांप्रमाणेच सवलत असलेल्या संस्थांसाठीही लागू असेल. सवलत असलेल्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनाचे व्यवस्थापन त्यांच्या ट्रस्टद्वारे केले जाते. {निवृत्तिवेतन समान असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वर्गीकरण कसे केले जाईल? मासिक वेतनाच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींमध्ये भेदभाव करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचबराेबर निवृत्तिवेतन याेजना कर्मचाऱ्यांना समान गट मानत असल्याचा तर्कही काेर्टाने फेटाळून लावला. विद्यमान याेजनेतून मिळणारे लाभ लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करता येऊ शकते. {अतिरिक्त याेगदानाची अट का अमान्य केली? याेजनेत पर्यायी सदस्यांसाठी १.१६ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या अंशदानाला अवैध मानण्यात आले हाेते. त्यामुळेच मूळ अधिनियम, ईपीएफ अधिनियम १९५२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या याेगदानाची गरज नाही. {भविष्य निर्वाह निधीला हे नियम लागू हाेतील? हाेय. न्यायालयाने आर.सी. गुप्ता यांचा निर्णय स्वीकारला आहे. पर्यायासाठी काेणताही कटऑफ असू शकत नाही, असे त्यात नमूद केले हाेते. {२०१४ पर्यंत निवृत्त होणारे कर्मचारी या कक्षेत समाविष्ट होतील? नाही. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही तरतूद लागू होणार नाही. कारण ते आधीच या सदस्यत्वातून बाहेर पडले आहेत. ते या निर्णयाचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...