आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये का वाढत आहे कोरोना:हॉस्पिटलमध्ये मनमानी बिलाच्या भितीपोटी लोकांचा ॲडमिट होण्यास नकार; तोपर्यंत रुग्णांची स्थिती गंभीर

मनीषा भल्ला9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद शहरात 32 कोविड सेंटर असून येथे कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत

देशात महाराष्‍ट्र राज्यात दररोज 300 च्या वर रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या तज्ञ टीमने महाराष्‍ट्राचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी राज्यातील 30 जिल्ह्यात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यांनी सादर केलेल्या अवहालानुसार, औरंगाबादमध्ये बेड्सची कमतरता, ऑक्सिजनसह इतर अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यात पुढे म्हटले आहे की, औरंगाबादला गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. कन्टेंटमेंट झोन, सर्विलांस आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीतही जिल्हा मागे आहे. दिव्य मराठीने केलेल्या सर्वेमधून आपण हे समजून घेऊया...

लॉकडाऊन प्रशासन लावते आणि जेवण आणि राशन एनजीओ देते
दिव्य मराठीने जिल्हाचा आढावा समजून घेण्यासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला. ते बोलताना म्हणाले की, शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल वसूली होत असल्याने लोक रुग्णालयात दाखल होण्यास नकार देत आहे. सरकारने शहरातील प्रमुख ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत हॉस्पिटल वाढवले पाहिजे, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे.

खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून लूट
खा. जलील म्हणतात की, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध आहे. परंतु, डॉक्टर आणि परिचारिका नसल्याने लोक मजबूरीने खाजगी हॉस्पिटलकडे वळत आहे. दरम्यान, त्यांना 3 ते 5 लाख रुपयापर्यंत बिल द्यावा लागत आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मरत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून विनाकारण औषधाची मागणी करीत आहे.

लोक विनामास्क रस्त्यावर फिरत आहे, प्रशासनाचे लक्ष नाही
लॉकडाऊनमध्ये अनेक एनजीओला सोबत घेत लोकांना मदत पोहचवणारे कादरी सांगतात की, या काळात लोक कोरोना संसर्गा विचार न करता रस्त्यावर विनामास्क फिरत आहे. ज्याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नाही आहे. कादरी यांनी पुढे म्हणाले की, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसमोर एका परिवारातील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दीड दिवस त्यांनी संपूर्ण औरंगाबाद शहरात उपचार घेण्यासाठी फिरले. परंतु, बेड न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकातील कोणीही मास्क लावलेला नव्हता.

रुग्णालयांना ऑक्सिजन गरजेपेक्षा कमी पुरवठा
औरंगाबाद शहरात 32 कोविड सेंटर असून येथे कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर शोएब हाशमी सांगतात की, शहरात सरकारी आणि खाजगी असे एकूण 2000 बेड्स आहे. परंतु, दररोज त्यामध्ये 20% ची कमी जाणवत आहे. औरंगाबादमध्ये 130 हॉस्पिटलमध्ये रोज 150 ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडते. परंतु, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...