आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांची घणाघाती टीका:लोकांची कामे खोळंबली अन् मुख्यमंत्री घरोघरी फिरतात, राजकीय सभा घेताहेत

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाराज नाही, स्टँप पेपरवर लिहून देऊ का? : अजित पवारांचे

१८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही. आता पितृपंधरवड्यामुळे १५ दिवस मंत्री कारभार हाती घेणार नाहीत, हा काय प्रकार आहे, असा सवाल करून जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नियुक्त केलेले नाहीत. मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली असताना मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरत आहेत. राजकीय सभा घेत आहेत, अशा कडक शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर सोमवारी हल्ला चढवला.

पितृपक्षामुळे १४ मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसून १८ पैकी केवळ ४ मंत्र्यानी पदभार स्वीकारल्याची बातमी ‘दिव्य मराठी’ने सोमवारी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली. मी नास्तिक नाही, परंतु राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने गणेश दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्याला पण काही मर्यादा असतात, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, रविवारी राष्ट्रवादीच्या दिल्लीतील अधिवेशन प्रसंगी नाराज असल्याच्या वावड्या उठल्यानंतर त्याचाही त्यांनी खुलासा केला. नाराज नाही हे स्टँप पेपरवर लिहून देऊ का, अशा शब्दांत पवारांनी त्या वृत्ताचे खंडन केले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शासकीय कर्मचारी वेठीस

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सभेसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना लेखी स्वरूपात पत्र काढत आदेश देण्यात आले आहेत.गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...