आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आयटीआयमध्ये मुलींच्या प्रवेशाचा टक्क वाढवा, संचालकांच्या आयटीआयला सूचना, 31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार नोंदणी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिकी शिक्षण प्रशिक्षण संस्थेत हार्ड ट्रेडलाही प्रवेशासाठी आता मुली पसंती दर्शवत आहेत. त्यांच्या या प्रवेशातील टक्केवारीचे प्रमाण वाढविण्यावर आणि त्यातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करा, अशा सूचना संचालकांनी आयटीआयला दिल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.

कमी वेळेत आणि कमी खर्च शिवाय रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह पालकांची पसंती ही आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी असते. नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाल्याने आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला आहे. रोजगारांच्या संधीमुळे ग्रामीण भागासह शहरातील वर्गही प्रथम आयटीआयच्या विविध ट्रेडला प्रवेश घेणे पसंत करतो. आजवर काही ठराविक ट्रेडलाच मुलींसाठी आयटीआयमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु गेल्या पाच-सात वर्षात मशिन ट्रेडलाही मुलींचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय वायरमन, इलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनो मराठी, इंग्रजी, हिंदी या ट्रेडला प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत ड्रेसमेकींग, फुडप्रोसेसिंगला अधिक प्रमाणात विद्यार्थीनी येतात. तर मुलांच्या औरंगाबाद आयटीआयतही जवळपास सव्वाशे ते दीडशे जागा मुलींसाठी राखीव आहेत. हार्डकोअर ट्रेडला मुलींचे येण्याचे प्रमाण पाहता आणि कंपनीत मुलींना देखील चांगली संधी मिळत असल्याचे लक्षात घेता मुलींना अधिकाधिक चांगली संधी मिळावी. कौशल्य विकासमध्येही मुलींच्या गुणांना वाव द्यावा असे म्हटले आहे. तेंव्हा मुलींची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना संचालकांनी केल्या आहेत.

आज मुलांबरोबरच विविध ट्रेडला विशेषत: वायरमन, इलेक्ट्रिशयन, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनो यासह मशिन ट्रेड, मेकॅनिकलसाठी मुली देखील प्रवेशावेळी विचारणा करता आहेत. प्रवेश घेत आहेत. त्यांचे हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी औद्योगिकी शिक्षण-प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींच्या टक्केवारीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद आयटीआयमध्ये मुलांसह मुलींनाही प्रवेश देण्यात येतो. सध्या दहा टक्के मुली प्रवेश घेतात हे प्रमाण आणखी वाढवण्याचे आहे. शिवाय आपाल्याकडे स्वतंत्र मुलींचा आयटीआय देखील आहे. आयटीआय गटनिदेशक रमाकांत पत्की यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अशी आहे आकडेवारी -
- मराठवाड्यात एकूण १३६ आयटीआय असून त्यांची प्रवेश क्षमता ही २० हजार २६४ इतकी आहे.
- औरंगाबाद - आयटीआयची संख्या १७ - प्रवेश क्षमता - ११७२ एकूण ट्रेड २९
- मुलींच्या आयटीआयमध्ये एकूण ७ ट्रेड आहेत. तर प्रवेश क्षमता ही १८० आहे.

बातम्या आणखी आहेत...