आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा सराव:राज्यात खेळांच्या सरावासाठी मान्यता, स्पर्धा-शिबिर आयोजनास मनाई

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नियम व अटींसह तीन गटांत केली खेळांची वर्गवारी

कोविड-19 महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र ठप्प आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर राज्यात कोरोनाचे नियम पाळून विविध खेळांच्या सरावास सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर खेळांच्या स्पर्धा, शिबिरे, कार्यशाळा घेण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे. राज्य क्रीडा विभागाच्या एसओपीअंतर्गत खेळांचा सराव करावा लागेल.

फक्त कंटेनमेंट झोनबाहेरील क्षेत्रात सरावास मान्यता राहील. खेळानुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यात प्रत्यक्ष संपर्क नसलेले खेळ, ज्यामध्ये तिरंदाजी, सायकलिंग, तलवारबाजी, नेमबाजी, अॅथलेटिक्स, योगा आदी प्रकार, दुसऱ्या गटात किमान मध्यम संपर्क येणारे खेळ, ज्यामध्ये फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, खो-खो आदी खेळ, तिसऱ्या गटात प्रत्यक्ष संपर्क येणारे खेळ, ज्यामध्ये कुस्ती, ज्युदो, वुशू, तायक्वांदो, कराटे, बॉक्सिंंग, वॉटरपोलो, कबड्डी आदी खेळ आणि जलतरण या सर्व खेळांसाठी मार्गदर्शक सूचना राज्य क्रीडा विभागाने जाहीर केल्या आहेत.

१. सरावाच्या ठिकाणी एकत्र गर्दी न करता १० ते १५ खेळाडू नियोजित वेळेत सराव करेल.

२. १४ वर्षांखालील खेळाडू व वरिष्ठ खेळाडू यांचा संपर्क येऊ नये यासाठी वेगवेगळ्या वेळा ठेवाव्यात.

३. सरावाच्या ठिकाणी नियमाप्रमाणे स्वच्छता, प्रत्येक सत्रादरम्यान सॅनिटायझर करावे.

४. खेळाडू, पालक यांना सर्दी-खोकला, ताप असल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास मनाई करावी.

५. शासनाच्या व क्रीडा विभागाच्या एसओपीचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.

६. क्रिकेटच्या सरावासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आणि बॅडमिंटन खेळासाठी महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेने बनवलेल्या नियमाप्रमाणे सराव करावा.

बातम्या आणखी आहेत...