आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:मुख्यमंत्र्यांच्या सभेला पंधरा अटींसह परवानगी; 8 जून ला होणार औरंगाबादमध्ये सभा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ८ जून रोजी औरंगाबादेत होणाऱ्या स्वाभिमानी सभेला अखेर पोलिसांनी शनिवारी १५ अटींसह परवानगी दिली. राज ठाकरे यांना घालण्यात आलेल्या सोळा अटींपैकी क्रमांक नऊची धार्मिक, जातीय, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याची अट वगळता उर्वरित त्याच अटींचा उल्लेख करत उपायुक्तांनी ही परवानगी दिली.

१ मे रोजी राज यांची सभा पार पडताच २ मे रोजी आमदार अंबादास दानवे यांनी उद्धव यांच्या सभेसाठी पोलिस आयुक्तांकडे अर्ज दाखल केला. ४ जून रोजी त्याला रीतसर परवानगी मिळाली. खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने राज यांच्या सभेप्रमाणे परवानगीसंदर्भात कुठल्याही किंतु-परंतुचा प्रश्नच नव्हता. शनिवारी दुपारी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर तयारीचा आढावा घेतला.

अट क्रमांक ९ वगळता त्याच अटींचा उल्लेख : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यांमुळे त्यांच्या औरंगाबादेतील सभेच्या परवानगीवरून तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांनी सभेच्या तीन दिवस आधी त्यांना सोळा अटींसह परवानगी दिली होती. त्यात त्यांच्या सभेच्या विषयामुळे क्रमांक नऊमध्ये सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्मावरून चिथावणी देणारे वादग्रस्त वक्तव्य कटाक्षाने टाळण्याची अट घातली होती. त्याच अटीच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याव्यतिरिक्त सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने व आवाजाच्या मर्यादेवरून अटी घालण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...