आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्म : १८ ऑगस्ट १९५९, तामिळनाडू कुटुंब : पती - परकाला प्रभाकर, मुलगी - परकाला वांगमयी शिक्षण : जेएनयूतून एम.फिल. मालमत्ता : सुमारे ३ कोटी रु. राज्यसभेच्या शपथपत्रानुसार
२० जून २००९, राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये नुकत्याच पक्षात दाखल झालेल्या निर्मला सीतारामन यांना भाषणासाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा व्यासपीठावर बसलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी राजनाथ सिंह यांना ‘भाषण ऐका, त्यात भरपूर शक्यता आहेत’, असे सांगितले. तो दिवस आणि आजचा दिवस, निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या नेत्या आणि मंत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळालेल्या त्या एकमेव महिला नेत्या आहेत. इंदिराजींनी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सीतारामन आजही खूप वाचतात. त्यामुळेच धोरणात्मक बाबींमध्ये पक्ष संशोधनाची जबाबदारी त्यांच्याकडेच देतो. त्यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महिला गटांत, विशेषत: बचत गटांत भाजपचा प्रचार केला. त्या तुटकी हिंदी बोलूनही प्रभाव पाडतात, कारण त्यांच्या बोलण्यात चांगले तर्क असतात. त्यांना रिकाम्या वेळेत शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते. त्यांना साड्यांची आवड आहे. कदाचित त्यामुळेच संशोधनाच्या वेळी ‘इंडो-युरोपियन टेक्सटाईल ट्रेड’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
१ फेब्रुवारीला त्यांनी देशाच्या महिला अर्थमंत्री म्हणून सलग ५ वा अर्थसंकल्प सादर केला. बालपण : वडील रेल्वे कर्मचारी, आई गृहिणी निर्मला यांचे वडील नारायणन सीतारामन रेल्वेत कर्मचारी होते. आई सावित्री गृहिणी होत्या. तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे परकाला प्रभाकर भेटले. दोघांनी १९८६ मध्ये लग्न केले. लग्नानंतर निर्मला ब्रिटनला गेल्या. प्रभाकर अर्थतज्ज्ञ व राजकारणी आहेत.
करिअर : संरक्षणमंत्री ते अर्थमंत्री लंडनमधील हॅबिटॅट कंपनीत सेल्स गर्ल म्हणून निर्मला यांनी करिअरची सुरुवात केली. यानंतर प्राइसवॉटरहाऊस कूपर्स आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठीही सेवा दिल्या. १९९१ मध्ये त्या भारतात परतल्या. २००३-२००५ पर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांची सासू परकला कालिकांबा या काँग्रेस आमदार, तर सासरे परकला शेषावताराम काँग्रेसचे मंत्री आहेत. असे असतानाही निर्मला यांनी २००६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २०१० मध्ये त्या पक्ष प्रवक्त्या झाल्या. आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून राज्यसभा सदस्य झाल्या. वाणिज्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. सप्टेंबर २०१७ मध्ये स्वतंत्र प्रभारासह देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री झाल्या. २०१९ मध्ये त्यांना अर्थमंत्री केले.
रंजक : सर्वात दीर्घ बजेट भाषणाचा विक्रम {फोर्ब्जने २०२२ मधील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये त्यांना ३६ वे स्थान दिले आहे. {२० मे १९९१ रोजी त्यांनी चेन्नईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर २१ मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. राजकीय तणावामुळे त्यांना तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले. गाडीवर पांढरा झेंडा लावून डॉक्टरांनी त्यांना घरी नेले. {देशातील सर्वात दीर्घ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये त्यांनी २ तास ४१ मिनिटे भाषण केले. {जेएनयूमध्ये शिकत असताना त्या फ्री थिंकर ग्रुपशी संबंधित होत्या. फ्री थिंकर म्हणजे ना डाव्यांसोबत होते ना काँग्रेससोबत असलेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.