आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन शाळकरी मुलाचा सतत पाठलाग करून व भररस्त्यात अडवून त्याच्यासोबत एका २६ वर्षीय मुलानेच अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला त्याचा विकृत प्रकार असह्य झाल्यानंतर मुलाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी किरण निकाळजे नामक तरुणावर बुधवारी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र आराेपी फरार आहे.
आई- वडील मोलमजुरी करणारा सोळा वर्षीय मुलगा राज (नाव बदलले आहे) अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतो. काही महिन्यांपासून किरणने त्याला त्रास देणे सुरू केले होते. राज परिसरात दिसताच त्याला उद्देशून अश्लील, आक्षेपार्ह शब्द उच्चारणे सुरू केले. राजच्या आई वडिलांनी आक्षेप घेतल्यास त्यांनादेखील किरण शिवीगाळ करत होता. या त्रासाला कंटाळून राजच्या आईवडिलांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, किरणने त्यानंतर त्यांचा नवा पत्ता शोधून काढत त्या परिसरात जाऊन हे प्रकार सुरू केले. राजच्या आईवडिलांनी त्याला जाब विचारला तेव्हा २ नोव्हेंबर रोजी किरणने घरात घुसून त्याला व त्याच्या बहिणीला मारहाण केली. एके दिवशी राज शाळेतून दुपारी घरी परतत असताना किरणने त्याला रस्त्यात अडवले व अश्लील प्रकार केला. राज घाबरला व घरी जाऊन त्याने आईला सांगितले. त्यानंतर त्याने दामिनी पथकाला संपर्क साधला. उपनिरीक्षक सुवर्णा उमप, लता जाधव, निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, गिरिजा आंधळे यांनी त्याची भेट घेऊन धीर दिला. त्यानंतर जवााहरनगर पोलिस ठाण्यात त्याला घेऊन गेले. उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी त्याच्या तक्रारीवरून निकाळजेविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर किरण निकाळजे फरार झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.