आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडेसिविर प्रकरण:रेमडेसिविर प्रकरणी खासदार सुजय विखेंविरुद्ध याचिका निकाली

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार डॉ. सुजय विखे यांनी 10 हजार रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याप्रकरणी याचिका

नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी निकाली काढली. याचिकाकर्त्यांनी तपासासंबंधी पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपासासाठी त्यांना पुरवणी तक्रार अर्ज देण्याची मुभा खंडपीठाने दिली.

राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना खा. सुजय विखे यांनी १०,०० इंजेक्शन विमानातून आणले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. यावर वस्तुस्थिती तपासण्याचे व चौकशी करण्याचे काम न्यायालयाचे नसून तपास अधिकाऱ्यांचे आहे, असे खंडपीठाने नमूद केले. रुग्ण व नातेवाइकांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. उमाकांत आवटे व अॅड. राजेश मेवारा यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...