आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात 30 लाख असे लोक सध्या जेलमध्ये आहेत ज्यांना न्यायालयासमोर सादरच केलेले नाही. एक वर्षापासून वीस वर्षापर्यत ही लोक जेलमध्ये आहेत. पुरावा नसतानाही त्यांना अटकेत ठेवले आहेत. मात्र त्यांच्याविरोधात बोलायला कोणीच तयार नाही. सहाव्या आणि सातव्या आयोगाने गब्बर झालेला मध्यमवर्गीयांना देशात काहीही झाले तरी आपल्याला काहीच त्रास होत नसल्याची भावना असून हा मध्यमवर्गीय आपल्यामध्येच मश्गुल झाला असल्याची टिका राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी केली आहे. कुमार केतकर तसेच कन्हैया कुमार यांच्या उपस्थितीत ज्येष्ट पत्रकार निरंजन टकले लिखीत 'हु किल्ड जज लोया' या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले.
महात्मा गांधी स्मारक निधी महात्मा गांधी भवन आणि धम्मगंगाग प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ट पत्रकार निरंजन टकले लिखीत 'हु किल्ड जज लोया' या पुस्तकाचे प्रकाशन कन्हैया कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.जयदेव डोळे, कुमार केतकर, पत्रकार निरंजन टकले धम्मगंगा प्रकाशनचे कृष्णा साळवे, महात्मा गांधी भवनचे कार्याध्यक्ष डॉ मच्छिंद्र गोर्डे उपस्थित होते.
आपल्याला काही होत नाही यातच मध्यवर्गीय मश्गुल
यावेळी केतकर यांनी मध्यमवर्गीय आणि त्यांच्या मानसिकतेवर जोरदार टिका केली. माध्यमात सुशांत सिंगच्या मृत्युनंतर तीन महिने चर्चा होती की त्यांने आत्महत्या केली तो मेला.मात्र लोयाच्या मृत्युवर वाहिन्यांनी तीन तास देखील चर्चा केली नाही. देशात एक चर्तुथांश मुले सध्याला कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत असतात. त्यांना समोरुन बस येतो की ट्रक येतो हे देखील कळत नाही. ही त्याच्यात मश्गुल झालेले आहेत. सहाव्या आणि सातव्या वेतनमुळे मध्यमवर्गीय लोक असे मश्गुल झालेले की त्यांना पेट्रोलचे भाव किती वाढले तरी ते जाणून घ्यायची इच्छा नाही. सोशल मिडीयाने त्यांची इच्छाच मारुन टाकली आहे. देशात आरबीआय सीबीआय न्यायालयीन व्यवस्था एकच भाषा बोलत आहेत. धर्म आणि विज्ञान एकत्र आणले जात आहेत. 30 लाख लोक जेलमध्ये असताना त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही.
150 रुपये पेट्रोल मात्र ज्ञानव्यापी काय असेल याची चिंता
कन्हैया कुमार म्हणाले की, खरे बोलणारे लोक संपत नाही हाच मानवताचा इतिहास आहे. माझी चिंता ही आहे की, आम्ही खरे कसे सांगावे ते तुम्हाला समजेल हा माझ्यासमोर चिंतेचा विषय आहे. तुम्ही सत्यासाठी केव्हा उभा राहताल. तुम्ही जोपर्यत लढणार नाही तोपर्यत जज पत्रकार पोलिस काहीच करू शकणार नाहीत. पेट्रोल 150 झाले तरी लोकांना ज्ञानव्यापी काय असेल यामध्ये रस असल्याची टीका त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.