आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिशाला कात्री:नांदेडात पेट्रोल शतकाच्या 2 पैसे मागे; प्रतिलिटरला 99.98 रुपयांचा दर, परभणीत ‘पॉवर’ पेट्रोल 101 पार

नांदेड/परभणी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, हिंगोलीतही दरवाढीने सर्वसामान्य जेरीस

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढत होत असून पेट्रोलचे प्रतिलिटर दर आता शंभरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहेत. रविवारी नांदेड जिल्ह्यातील बिलोलीत पेट्रोलचे प्रतिलिटर दर ९९ रुपये ९८ पैसे, तर धर्माबादमध्ये हेच दर ९९ रुपये १४ पैशावर पोहोचले. त्याखालोखाल परभणीत पेट्रोलचा दर ९९ रुपये १२ पैशावर पोहोचला. पॉवर पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०१.८९ रुपयांवर पोहोचले आहेत. आैरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली येथेही दर जास्त असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

रविवारी नांदेडमध्ये पेट्रोल ९८ रुपये ९९ पैसे, डिझेल ८८ रुपये ६६ पैसे प्रतिलिटर होते, तर धर्माबादमध्ये डिझेल ८८ रुपये ८१ पैसे, बिलोलीत डिझेल ८७ रुपये २६ पैसे प्रतिलिटर इतका दर गेला आहे. देगलूरमध्ये पेट्रोल ९८ रुपये, तर डिझेल ८६ रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका असलेल्या किनवटमध्ये पेट्रोल ९५ रुपये ६ पैसे, डिझेल ८८ रुपये ४८ पैसे इतका दर आहे. या ठिकाणी अकोला येथून पेट्रोल येते. तसेच खासगी कंपनीच्या पेट्रोल दराने मात्र शंभरी पार केली आहे. नांदेडसह अन्य तालुक्यांमध्ये सोलापूर, अकोला, नाशिक, मनमाड आदी ठिकाणांहून पेट्रोल येत असून लांबच्या अंतराची या दरामध्ये भर पडत आहे.

उस्मानाबाद : पेट्रोल ३७ पैशाने महागले
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. शनिवारी पेट्रोल ३७ आणि डिझेल ३८ पैसे प्रतिलिटरने महागले आहे. यामुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९७.३५ रुपये, तर डिझेल ८७.०८ रुपये प्रतिलिटर आहेत. जीवनावश्यक वस्तूंची सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे कोरोनाच्या आर्थिक मंदीच्या झळा सोसाव्या लागत असताना जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे दरवाढ केली जात आहे.

परभणी : २० दिवसांत पेट्रोल ३ रुपये ९० पैसे महाग
रविवारी पेट्रोलचे प्रतिलिटर दर ९९ रुपये १२ पैसे होते. डिझेलचे ८८ रुपये ७६ पैसे प्रतिलिटरने विक्री होत होते. पॉवर पेट्रोलचे दर १०१ रुपये ८९ पैसे एवढे होते. गेल्या एक ते दीड महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व पॉवर पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत आहे. वाढलेल्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परभणीत १ फेब्रुवारी रोजी पेट्रोलचे दर ९५ रुपये २२ पैसे, डिझेलचे दर ८४ रुपये ३२ पैसे, पॉवर पेट्रोलचे दर ९७.९७ पैसे एवढे होते. हाच दर १९ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९८ रुपये ७४ पैसे, डिझेल ८८ रुपये ३८ पैसे, पॉवर पेट्रोल १०१ रुपये ५२ पैशावर पोहोचले. २० व २१ रोजी पेट्रोलचे प्रतिलिटर दर ९९ रुपये १२ पैसे, डिझेल ८८ रुपये ७६ पैसे, तर पॉवर पेट्रोलचे दर १०१ रुपये ८९ पैसे एवढे होते.

बातम्या आणखी आहेत...