आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या दंगलीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विचारांशी सहानुभूती असलेल्या तरुणांचा सहभाग असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून आतापर्यंत १८ संशयितांना अटक करण्यात आली. तसेच पीएफआयशी संबंधित एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी घातली होती. तेव्हा शहरातील काही संशयितांना अटकही झाली होती. तेव्हाच संघटनेचे पुढील टार्गेट न्यायव्यवस्था व पोलिस असल्याचा इशारा एटीएसने दिला होता. तो खरा ठरला. २९ मार्चच्या रात्री दंगेखोरांनी १४ पोलिस वाहने जाळली, तर १७ पोलिस दगडफेकीत जखमी झाले.
संशय कशामुळे...? ‘पीएफआय’चे शहरात पूर्वीपासून जाळे; तरुणांचे ब्रेनवॉश - दंगेखोरांना मदतीचा ठपका 1 अवैध आर्थिक व्यवहाराचा ठपका ठेवत २०१९ मध्ये जिन्सीतील पीएफआयच्या कार्यालयावर ईडीचा छापा. त्यात राजाबाजार दंगलीतील आरोपींना कायदेशीर मदतीसाठी फंडिंग केल्याची कागदपत्रे सापडली होती. 2 सप्टेंबर २०२२ मध्ये तपास यंत्रणांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पहाटेच्या वेळी एकदाच छापे टाकून ‘पीएफआय’शी संबंधित २१ पदाधिकाऱ्यांना अटक केली, अनेकांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. 3 तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी संशयितांची चौकशी करून त्यांच्या घराची झडतीही घेतली होती. संघटनेच्या कारवायांसाठी शहरातील काही लोकांकडून संघटनेला फंडिंग केले जात असल्याचेही उघड झाले होते. 4 या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रमुख लक्ष्य न्यायव्यवस्था व पोलिस विभाग, अधिकारी असल्याचेही सहा महिन्यांपूर्वी एटीएसने केलेल्या चौकशीतून समोर आले होते. तसा अलर्टही त्यांनी यंत्रणांना दिला होता.
हे गंभीर प्रश्न अनुत्तरित शहरातील श्रीराम मंदिरासमोर दोन गटांत झालेल्या किरकोळ वादानंतर शेकडोंचा जमाव अचानक किराडपुऱ्यात जमा कसा झाला ? तोंडाला रुमाल, जॅकेट घातलेले तरुण तयारीनिशी कसे आले ? दंगेखोरांकडे बाटल्यांमध्ये भरलेले पेट्रोल, कापडी बोळे कुठून आले? निष्णात असल्याशिवाय पेट्रोल बॉम्बचा वापर कसे करू शकले? जमलेल्या हिंसक जमावाचे टार्गेट व हल्ल्याचा उद्देश नेमका काय होता? स्थानिकांचे एकही वाहन आरोपींनी जाळले नाही. एकही घर लक्ष्य झाले नाही. फक्त पोलिस वाहने लक्ष्य. ‘वज्र’सारखी अवजड पोलिस वाहने अप्रशिक्षित मुले पेटवू शकतात का?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.