आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • PG Admission Update BAMU Update | 3068 Applications Complete, University Granted 4 Days Extension; In The Midst Of The Professors' Non cooperation Movement

पीजी प्रवेशाच्या 2895 अर्जांमध्ये त्रुटी:3068 अर्ज परिपूर्ण, विद्यापीठाने दिली 4 दिवसांची मुदतवाढ

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अखेर प्रवेश प्रक्रियेला 4 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता 21 ऑगस्टपर्यंत पीजीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत, त्यांना त्रुटी दुर करून त्यांचे अर्जही या दरम्यान परिपूर्ण करता येईल. 2 हजार 364 जागांसाठी आत्तापर्यंत 3 हजार 68 परिपूर्ण अर्ज केले आहेत. 22 ऑगस्टला छाननीचे नियोजन आहे, पण प्राध्यापकांच्या असहकाराचा फटका विद्यार्थी प्रवेशाला बसण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाने 6 ऑगस्टला पदवी परीक्षांचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 8 ऑगस्टपासून प्रत्यक्ष प्रवेश सुरू झाले होते. 17 ऑगस्टला प्रवेशाची अंतिम मुदत होती. ‘दिव्य मराठी’ने ‘पीजी प्रवेशाला मुदतवाढ अटळ’ या आशयाचे वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी चार दिवसांच्या मुदतवाढीला मान्यता दिली आहे. 18 ऑगस्टला यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑगस्टपर्यंत प्रवेश चालतील. 22 ऑगस्टला आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल.

यावर करा तक्रार

23 ते 26 ऑगस्टपर्यंत pgadmisson@bamu.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थी तक्रार करू शकतात. तत्पूर्वी 23 ऑगस्टला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी 29 ऑगस्टला जाहीर होणार आहे. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान समुपदेशन फेरी होईल. 7 तारखेला स्पॉट ऍडमिशनची मुदत आहे.

तीन हजार अर्ज अपूर्ण

विद्यापीठातील 51 विभागांच्या 2 हजार 364 जागांसाठी 5 हजार 963 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 3 हजार 68 अर्ज परिपूर्ण आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन शुल्क, सर्व शैक्षणिक कागदपत्रांची पीडीएफ कॉपी स्कॅन करून अपलोड केले आहेत. पण 2 हजार 895 अर्जांमध्ये त्रुटी आहे. या विद्यार्थ्यांना त्रुटी दुर करण्याची मुदत संपुष्टात आली होती. त्यांना आता 21 ऑगस्टपर्यंत अर्ज परिपुर्ण करता येईल. किंवा नव्याने विद्यार्थी अर्ज करू शकतील.

प्राध्यापक सहकार्य करतील

विद्यापीठाच्या दृष्टीने प्रवेश आणि परीक्षा अतिशय महत्वाच्या असतात. या कामातून कुणालाही अंग काढता येणार नाही. प्रशासन आणि अध्यापक असे दोन घटक नसतात. प्राध्यापक देखील प्रशासनाचाच भाग असतो. छाननी आणि पुढील सर्व प्रवेश प्रक्रियेत ते मदत करतीलच. 127 कोटींच्या अनियमितते प्रकरणात कुणावर अन्याय होणार नाही. याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ- डॉ. शाम शिरसाट, प्र-कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...